भारतीय संविधान जतन करणे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य ए.वाय.पाटील यांचे प्रतिपादन

गुडाळ प्रतिनिधी/ संभाजी कांबळे


भारताचे संविधान हे संपुर्ण जगाला मार्गदर्शक असून या संविधानाचा सन्मान व रक्षण करणे हे सर्वाचे कर्तव्य आहे,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी केले.
रिपब्लीकन पक्षाच्यावतीने (गवई गट) कुरुकली (ता.करवीर ) येथे आयोजित केलेल्या संविधान सम्मान परीषदेप्रसंगी ते बोलत होते.परीषदेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पी.एस.कांबळे हे होते.बदलत्या परिस्थितीत संविधानाचा हेतू व महत्व प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे ए.वाय.पाटील यांनी सांगितले.यावेळी बोलताना पी.एस.कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळापर्यत पोहचवून संविधानाचे रक्षण केले पाहीजे असे सांगितले.
यावेळी पक्षाचे नुतन जिल्हाध्यक्ष पांडूरंग कांबळे,महिला जिल्हाध्यक्षा माधवी देशमुख,युवा अध्यक्ष सिध्दांत देशमुख,भिमराव कांबळे,डॉ.आंबेडकर चरित्र अभ्यास समितीचे सदस्य प्रा.चंद्रशेखर कांबळे, यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डी.जी.भास्कर,पांडूरंग कांबळे,माधवी देशमुख,नंदकुमार गोंधळी,सर्जेराव कांबळे,साताप्पा कांबळे,भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील,यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.
प्रारंभी राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमासह संविधानाचे पुजन करण्यात आले.कार्यक्रमाला गोकुळचे संचालक प्रा.किसन चौगले,भोगावतीचे संचालक जयवंत कांबळे,पांडूरंग पाटील,माजी संचालक वसंतराव पाटील,अशोक कांबळे,भाऊसो काळे,डी.के.कांबळे,सिताराम कांबळे,सतिश माने,एम.आर.कांबळे,राधानगरीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे,,कागलचे अध्यक्ष साताप्पा कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले.स्वागत भिमराव कांबळे यांनी व प्रास्ताविक आर.एस.कांबळे यांनी केले.आभार संभाजी कांबळे यांनी मानले.