रत्नागिरी | खेडमध्ये पडवीच्या खांबाला बांधून कोयतीच्या धाकाने ठार मारण्याची दिली धमकी

रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी

खेड तालुक्यातील धामणंद येथे एकाला पडवीच्या खांबाला रस्सीने बांधून पोटात हाताच्या ठेवल्याने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी करुन ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद भूषण प्रकाश चांदे (31 धामणंद गावठाण महापदीवाडी खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली आहे.

चांदे हे गाय चरवण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या जागेत कंपाऊंडमध्ये सोडुन परत येत असताना सखाराम भगवान कदम (50, रा. धामणंद, खेड) चांदे यांच्या जमिनीतील झाडे तोडत असतानाचा फोटो काढला. त्याच वेळी भगवान कदम याने पाठीमागून येऊन चांदे यांना मागून घट्ट मिठी मारून पकडून उचलून त्यांचे घराच्या पडवीच्या खांबाला हातातील रस्सीने बांधून ठेवले. त्यानंतर कदम याने पोटामध्ये ठोशाने मारहाण करून शिवीगाळ करत कोयतीचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. ही घटना 9 जानेवारी रोजी स.8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

यावेळी भूषण चांदे यांचे वडील सोडवण्यासाठी आले असता कदम याने चांदे यांच्या वडिलांच्या हाताच्या मनगटावर मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद चांदे यांनी पोलीस स्थानकात दिल्यानंतर कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.