रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्ह्याच्या कार्यकारिणीची बैठक 9 जानेवारी 2022 रोजी जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. वंचितची रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी नियुक्ती केल्यानंतर पहिलीच बैठक आज रत्नागिरी, सावंत हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला लोकसभेचे उमेदवार मा. काका जोशी तसेच उपाध्यक्ष सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत तालुकानिहाय बैठक घेऊन जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडे देण्यात येईल. असा निर्णय घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची प्रत्येक तालुका बांधणी आणि आगामी ZP, पंचायत समिती सर्वच निवडणुकाबाबत तसेच तालुका कार्यकरण्याचे गठन करण्याबाबत रुपेंद्र जाधव ,काका जोशी , सुभाष जाधव यांच्या समवेत सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष अनंत सावंत, महासचिव प्रशांत कदम, सचिव राजेंद्र यादव, कोषाध्यक्ष डॉ. मुकुंदराव चंदनशिवे, जिल्हा संघटक गणपत भायजे, संपर्क प्रमुख सचिन कांबळे , जिल्हा प्रवक्ते दीपक कांबळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.