समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या 13 व्या स्मृतीदिनी मलकापूर येथे अभिवादन
पत्रकारांचा करण्यात आला सन्मान
मलकापूर प्रतिनिधी:करण झनके
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची परिवर्तनशील विचारसरणी प्रतिकूल परिस्थितीत जनमानसात खऱ्या अर्थाने रुजविनारे,भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष मराठवाड़ा विद्यापीठ नामविस्ताराचे अग्रणी शिलेदार
समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या 13 व्या स्मृतीदिनानिमित्त 11 जानेवारी रोजी दैनिक अहिल्याराज कार्यालय, मलकापूर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
दरवर्षी या दिनी भव्य जाहीर अभिवादन सभा, व विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार सन्मान तथा प्रबोधनात्मक शाहिरी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात परंतु यावर्षी कोरोना, ओमिक्रोन महामारीच्या उद्धभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम स्थगित करून साधेपणाने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला
याप्रसंगी समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले
तसेच या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांचे हस्ते मलकापूर येथील पत्रकार बांधवांचा सन्मान करून भेटवस्तू देण्यात आल्या
या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार उल्हासभाऊ शेगोकार, विरसिंह राजपूत, श्रीकृष्ण भगत, संदीप सावजी, विनायक तळेकर, सतीश दांडगे, एन . के.हिवराळे, अजय टप, धनश्री काटीकर, स्वप्निल अकोटकर, धीरज वैष्णव, करणसिंह सिरसवाल, श्रीकृष्ण तायडे,प्रा.प्रकाश थाटे, शेख निसार, दीपक इटनारे, कृष्णा मेसरे, विजय वर्मा यांच्या सह आदी पत्रकार उपस्थित होते
Posted inबुलढाणा