रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या धर्तीवर निरीक्षक ॲड गुलाबराव घोरपडे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अविनाश लाड साहेब यांच्या हस्ते रत्नागिरी शहर अध्यक्ष पदी प्रभारी शहरअध्यक्ष म्हणून साईराज चव्हाण यांची निवड करण्यात आली. तदप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, महिला जिल्हाध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे,सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ताशेठ परकर, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.