भाजीविक्रेत्याला विनामास्क फिरणे चांगलेच भोवले; मलकापूर पोलिसांची विनामस्क फीरणाऱ्यांनावर कडक कारवाई

मलकापूर प्रतिनिधी/करण झनके

मलकापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र तरीही लोक गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारला असून, मलकापूर शहरातील आठवडे बाजारात विनामास्क भाजीपाला विकणाऱ्याला पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काल, १५ जानेवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलीस उपनिरिक्षक गोपाल राठोड यांनी या प्रकरणात तक्रार दिली. शेख नदीम शेख कादर (३६, रा. ताजनगर पारपेठ मलकापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. पोलीस उपनिरिक्षक श्री. राठोड हे पोलीस उपनिरिक्षक श्री. बोराडे, पोकाँ संतोष निंबाळकर, चालक नापोकाँ संजय गायकवाड यांच्यासह मलकापूर शहरात पेट्रोलिंग करत होते. आठवडे बाजारात शेख नदीम हा तोंडाला मास्क अथवा कोणताही रूमाल न लावता हातगाडीवर भाजीपाला विकत होता. त्याला पकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजीपाला विक्रेत्यांनो, तुमची मनमानी तुम्हाला भोवेल.

जिल्ह्यात अनेक भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले मास्क न लावताच शहरभर फिरत असतात. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यांनी मास्क लावणे आवश्यक आहे. पण ते मनमानी करताना दिसतात. मास्क न लावणाऱ्या अशा विक्रेत्यांविरुद्ध आता पोलिसांनीच कारवाईचा बडगा उगारल्याने आता तरी ते नियम पाळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.