रत्नागिरी : शहराजवळील एमआयडीसीत अकरा एकर जागेवर उभारण्यात येणारे जिल्हा क्रीडा संकुलाचे काम निधीअभावी रखडले होते. मात्र राज्य शासनाने रत्नागिरीसह चार जिल्ह्यांना २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे या कामाला चालना मिळणार आहे. या निधीतून मैदानी खेळासाठी सिंथेटीक ट्रॅक आणि मुलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी प्राधान्य मिळण्याची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सुमारे सात वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या रत्नागिरीतील जिल्हा क्रीडा संकुलाचे काम निधीअभावी रखडले. अकरा एकरच्या जागेमध्ये कार्यालयासाठी इमारती, चारशे मीटरचा मैानी खेळांसाठी सिंथेटीक ट्रॅक, बहुउद्देशीय सभागृह, संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. तसेच खो-खो, कबड्डीसह विविध खेळांची मैदाने बनवण्यात येणार आहेत. स्पर्धांसाठी येणार्या खेळाडूंना राहण्यासाठी ५० मुले, ३० मुली राहतील, एवढ्या क्षमतेचे वसतिगृह उभारले जाणार आहे. यासाठी वीस कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला आहे. भूमिपूजन झाले, तेव्हा पाच कोटींचा निधी मिळाला होता. मात्र त्यामधून मैदाने, वसतिगृह बनवण्यापेक्षा कार्यालयीन इमारत, ऑलिंपिकच्या धर्तीवर आकर्षक भिंत उभारण्यावर भर देण्यात आला हाेता
Posted inरत्नागिरी