तुम्ही मुदत ठेवींसाठी म्हणजेच FDसाठी ऍक्सिस बँकेचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. ऍक्सिस बँकेने मुदत ठेवींचे म्हणजेच FDचे व्याजदर वाढवले आहेत. हे दर 20 जानेवारी 2022 पासून लागू झाले आहेत. ऍक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या विविध मुदतींमध्ये ठेवींची सुविधा देते.
सध्या बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या मुदतीच्या ठेवीवर 2.50 टक्के व्याजदर देत आहे. तर 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी 3 टक्के व्याजदर देत आहे, तसेच 3 महिने आणि 6 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 3.5 टक्के व्याजदर आहे. त्याचबरोबर बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदरातही बदल जाहीर केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 2.5 ते 6.50 टक्के व्याजदर मिळेल.
महत्त्वाचे म्हणजे बँकेने ठराविक कालावधीसाठीच व्याजदर वाढवले आहेत. दरम्यान, अलीकडेच SBI, Kotak Mahindra Bank, ICICI आणि HDFC बँकेनेही मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत.