मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने शुक्रवारी अंधेरी आणि धारावीत छापे घालून कारवाई केली. त्यात महिलांच्या कपड्यात दडवलेले ३.९ किलो अंमलीपदार्थ जप्त केले. ते जहाजातून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एनसीबीच्या अंधेरी शाखेने शुक्रवारी धारावी आणि अंधेरी पूर्व येथे छापे घातले. त्यात त्यांनी महिलांच्या कपड्यांमध्ये दडवलेले ३ किलो ९५० ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. हे अंमलीपदार्थ पुण्यातून मुंबईत आणले होते. ते मुंबईतून समुद्रमार्गे जहाजातून ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार होते. या प्रकरणाचा एनसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत, असे त्यांनी सांगितले.