राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

मलकापूर प्रतिनिधी / उमेश ईटनारे

दरवर्षी 26 जानेवारी , 1 मे , 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम , महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो . कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात , रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत : पडलेले दिसतात , असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात . त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो .भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या , माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे . परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे . दरवर्षी 26 जानेवारी , 1 मे , 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम , महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो . याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे . त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे .असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले