Covishield आणि Covaxin लस आता खुल्या बाजारात विकण्यास DCGI ची परवानगी

⭕ लसींच्या किंमतींबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही.

कोरोना महामारीविरोधात लढा देण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. सध्या देशात कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. मात्र आता दोन्ही लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या दोन्ही लसींच्या बाजार विक्रीसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे मेडिकल स्टोरमध्ये इतर औषधांप्रमाणे आता कोरोना लस मिळणार आहे. या दोन्ही लसींची प्रत्येकी किंमत 275 रुपये असणार असल्याची माहिती आहे. तर सर्व्हिस चार्ज 150 रुपये इतका लागण्याची शक्यता आहे.

सध्या कोवॅक्सिन लसीची खुल्या बाजारात 1200 रुपये किंमत आहे. तर कोव्हिशील्डचा एक डोस 780 रुपये आहे. या दोन्ही लसींवर 150 रुपये सर्व्हिस चार्ज आकारला जातो. या दोन्ही लसींना आत्पकालीन वापरासाठी परवानगी आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन या लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्याने आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक कंपन्यांना देशभरात वितरण व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. परवानगीनंतर आता कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन लस रुग्णालय आणि मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी देखील यासंदर्भातील माहिती दिली आहे.

खुल्या बाजारात लस विक्रीला परवानगी मिळाल्याने आता नागरिक मेडिकल स्टोरमधून लस विकत घेऊन ती डॉक्टरांकडून टोचून घेऊ शकतात. यामुळे लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यास मदत मिळणार आहे. मात्र लसींच्या किंमतींबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही.