Mumbai goa highway | संगमेश्वर बसस्थानकासमोर महाविकास आघाडीचे चक्काजाम आंदोलन!

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाबाबत संगमेश्वर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने संगमेश्वर बसस्थानकासमोर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी, माजी आमदार सुभाष बने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे माझी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विवेक शेरे, रोहन बने, राजेंद्र सुर्वे, हनी भाई हरचिलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.