अफवांना बळी पडू नये
पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत
मलकापूर – उमेश ईटणारे
मलकापूर शहर परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , कर्नाटक राज्यामध्ये हिजाब वरून घडलेल्या घटनेच्या संबंधित सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचे कारणावरून बऱ्याच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे . तरी सदर घटने संबंधित कोणीही आक्षेपार्ह र्व्हिडीओ पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये . अशी पोस्ट व्हिडिओ टाकल्यास टाकनारा व इतर संबंधित यास जबाबदार धरून त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल . मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये आज शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत बैठकीत पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी सांगितले शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मलकापूर शहरपोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधा तसेच जो कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल