रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्या परिषद आरोग्य विभागातील गट -क, गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात 2019 ला काढण्यात आली. खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र उमेदवारांनकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातुन लाखो उमेदवारांनी यासाठी परीक्षा दिल्या मात्र काही कारणांनी ही संपुर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे कळवण्यात आले. मात्र त्यानंतर मोठा कालावधी गेला तरीही या आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा परीक्षा घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येते नाहीत. बेरोजगारी वाढली असताना महाराष्ट्र शासनाचे वेळकाढूपणाचे धोरण पाहता तरुणांच्या करिअर बाबत शासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. तरी आम्ही भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ही परीक्षा तातडीने 15 दिवसात घेण्याची विनंती आपणास करीत आहोत. तसेच जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना व कोरोना काळात काम केलेल्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात यावे. अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
हे निवेदन रत्नागिरी उपजिल्हाधिकारी साठे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विक्रम जैन, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मंदार लिंगायत, शहर सरचिटणीस संदीप सुर्वे, शहर चिटणीस निलेश आखाडे. आदी उपस्थिती होते.