:राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये महाराष्ट्राला पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळाला. त्यामध्ये कोल्हापूर ग्रुप अंतर्गत एनसीसी छात्रांचा सहभाग मोठा होता. आपण सर्वांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर या सन्मानामध्ये कोल्हापूर ग्रुप एनसीसीचा सिंहाचा वाटा आहे.
असे गौरवउद्गार कोल्हापूर ग्रुप एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर समीर साळुंखे यांनी काढले.
ते कोल्हापूर ग्रुप एनसीसी भवन येथे दिल्लीच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या छात्रांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते.
ब्रिगेडियर साळुंखे म्हणाले , पालकांच्या मार्गदर्शना शिवाय तुमचे यश अधुरे आहे भविष्यात आपल्या पालकांची तसेच एनसीसी ग्रुप, बटालियन, कॉलेजची मान उंचावेल असे मोठे काम करा. दिल्लीच्या परेडसाठी तुम्हा सर्वांना खूप मेहनत घेतली याचेच फळ म्हणजे खूप वर्षांनी महाराष्ट्राला पंतप्रधान बॅनर्सचा बहूमान मिळाला.
यावेळी डेप्युटी ग्रुपकमांडर कर्नल विशाल गौरव , कन्टीजंट कमांडर कर्नल पराग गुप्ते, ट्रेंनिग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल समीर मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम प्रसंगी प्रथमच एनसीसी छात्रांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. छात्रांना मेडल तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले.त्याचबरोबर आर्मी स्टाफ
निवृत्त कॅप्टन बळीराम पाटील, बीएचएम सुरजितसिंग, हवालदार सचिन जगदाळे, हवालदार साबु व्ही यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महानिदेशक राष्ट्रीय कॅडेट कोर दिल्ली यांचे कडून सन्माचिन्ह मिळाले वरिष्ठ लिपिक संजय शिवराम शेटे व व्ही आर भोसले यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कर्नल संजीव सरनाईक, कर्नल गणपती,कर्नल मंजुनाथ हेगडे, कर्नल विजयंत थोरात,कर्नल डी एस सायना, मेजर गुमामालती ए , बीएचएम सचिन जगदाळे, बीएचएम राजन आदी अधिकारी उपस्थित होते.
कॅडेट श्रेया देसाई , संकेत चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सूत्रसंचालन श्रुती बाम तर आभार प्रदर्शन वैनायकी
कुलकर्णी यांनी मानले.
सत्कार मूर्ती छात्र
कॅडेट वैनायकी दिपंकर कुलकर्णी ( 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी,डि डी शिंदे सरकार कॉलेज कोल्हापूर ), संकेत सातप्पा चौगले (5 महाराष्ट्र बटालियन, राजाराम कॉलेज कोल्हापूर ) , श्रुती हरीश बाम ( 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर), श्रेया मिलिंद देसाई ( 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर) ,प्रथमेश अनिल शिंदे ( १६ महाराष्ट्र बटालियन, चिंतामणी आर्ट कॉमर्स कॉलेज,सांगली), दिशा दीपक पाटकर ( १९ महाराष्ट्र बटालियन, डी बी जे कॉलेज चिपळूण ) , सुमीत धारासिंग साळुंखे ( २२ महाराष्ट्र बटालियन, एल बी एस कॉलेज सातारा ), समृद्धी अमोल कदम ( २२ महाराष्ट्र बटालियन , व्ही सी कॉलेज सातारा ) , ओंकार सीताराम मोरजकर ( ५८ महाराष्ट्र बटालियन, एस आर एम कॉलेज कुडाळ )