* मुली व महिला बुद्धिबळ स्पर्धा २०२२*(स्थानिक हातकणंगले, शिरोळ तालुका मर्यादित )
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने , लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व केन चेस अकॅडमी इचलकरंजी यांच्या वतीने महिला बुद्धिबळ स्पर्धेचे रविवार दि. ०६मार्च रोजी लायन्स ब्लड बँक , दाते मळा, इचलकरंजी येथे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला रविवारी सकाळी दहा वाजता सुरुवात होईल. या स्पर्धेत फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बुद्धिबळपटू सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत भाग घेण्यासाठी २५० रु. फी ठेवली आहे. स्विस लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धा मुली व महिलांच्या एकत्र गटात होणार आहेत. प्रत्येक खेळाडूस दहा मिनिटे व पाच सेकंद वाढीव वेळ प्रत्येक चालीस देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील मुली/ महिला बुद्धिबळपटूना प्रत्यक्ष बोर्ड वर होणाऱ्या या स्पर्धेत भाग घेण्याची संधी निर्माण झाली आहे..कोव्हीड संदर्भात सर्व शासकीय नियमाचे( मास्क,सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग इ.) पालन करून स्पर्धा घेण्यात येणार आहे व हे सर्व नियम स्पर्धकांनी व पालकांनी पाळणे बंधनकारक असणार आहे. स्पर्धेदरम्यान नाष्टा देण्यात येईल. अध्यक्ष ला. लक्ष्मीकांत भट्टड, सचिव शैलेंद्र जैन, खजिनदार महेंद्र बालार, क्लब संचालक ला. विजयकुमार राठी व सौ. रचना निकुंज बगडिया (केन चेस अकॅडमी) यांनी आव्हान केले आहे की स्थानिक मुली व महीला नी महिला दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या या बुद्धीबळ स्पर्धा यशस्वी कराव्यात.
अधिक माहिती साठी खालील व्यक्तिशी संपर्क साधावा व आपली नांवे शुक्रवार दि.०४ मार्च २०२२ रात्री आठ वाजेपर्यंत नोंदवावीत.
♟️ राज्य पंच.शंकर आडम 9021954464
♟️ राज्य पंच.रोहित पोळ – 9657333926
♟️ ला.कृष्णा भराडिया – 9370328282
मुली व महिला बुद्धिबळ स्पर्धा २०२२
