इचलकरंजी ता. 19 फेब्रुवारी -रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ताराराणी पक्षाच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये युवती महिलांसह युवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अखंड विश्वाला प्रेरणा देणाऱ्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीमुळे उत्साह आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. प्रारंभी ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ताराराणी पक्षाच्यावतीने पक्ष कार्यालयापासून मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाराजांची आकर्षक मूर्ती व मूर्तीवर अभिषेकासाठी खास कलश बनवून घेण्यात आला होता. चांदीचा कलश त्याला सोन्याचा मुलामा देऊन रत्नांनी सजविण्यात आले होते. मिरवणूकमध्ये युवती, महिलांसह युवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात भगवा ध्वज आणि डोक्यावर भगवा फेटा यामुळे शहर शिवमय झाले होते. शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ताराराणी पक्ष कार्यालयापासून निघालेली मिरवणूक कॉ. के. एल मलाबादे चौकातून शिवतीर्थ येथे आली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रथम महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर आमदार प्रकाश आवाडे व कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काही युवती व महिलांनी लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी आवाडे जनता बँकेचे व्हा. चेअरमन चंद्रकांत चौगुले, बाळासाहेब कलागते, प्रकाशराव सातपुते, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, रुबन आवळे, अरुण आवळे, सर्जेराव पाटील, महावीर केटकाळे, महेश सातपुते, महावीर कुरुंदवाडे, दीपक सुर्वे, अनिल कुडचे, संजय केंगार, शंकर येसाटे, बंडोपंत लाड, मुरारजी देसाई, सुरेश कोल्हापूरे, चंद्रकांत इंगवले, नरसिंह पारीक, शैलेश गोरे, नारायण दुरुगडे, राहुल घाट, श्रीशैल बिळ्ळुर, रंगराव लाखे, कुमार पलंगे, प्रविण केसरे, श्रीकांत कोरवी, मनु फरास, राजू माळी, दत्तात्रय कसलकर, पंडीत जामदार, ज्ञानेश्वर गोरे, तात्या यादव, राजाराम बोंगार्डे, शशिकांत दरीबे, सुवर्णा लाड, तुळसाबाई काटकर, नजमा शेख आदींसह ताराराणीचे पदाधिकारी व आवाडे समर्थक मोठ्या संखेने उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
ताराराणी पक्षाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी
