कबनूर -(विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर )
छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड व जनहित फौंडेशन तर्फे दत्तनगर शाहापुर हद्द इचलकरंजी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माननीय दस्तगीर बाणदार बाबा यांच्याकडून जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आकाश मुल्ला यांना छत्रपतीची मूर्ती भेट देण्यात आली त्यानंतर माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार अर्पण करून जिलेबीचे वाटप करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी बाणदार बाबा यांनी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुस्लिम मावळ्यांना प्राधान्याने स्थान देण्यात आले होते स्वराज्य निर्मितीत मुस्लिम मावळ्यांचे मोठे योगदान होते अशा या राज्याचा आदर्श व आचार विचार सर्वच जाती धर्माच्या लोकांनी घेतले पाहिजेत आज खऱ्या अर्थाने याची गरज आहे असे झाले तर राज्य व देश सुजलाम सुफलाम होण्यास फार काळ लागणार नाही असे प्रतिपादन केले.
महाराजांच्या सर्व धर्म समभाव याच विचाराने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, ऑल इंडिया हुमान राइट्स चे पदाधिकारी जनहित फाउंडेशनचे पदाधिकारी इचलकरंजी परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मिळून भव्य रक्तदान शिबिर, मोफत मोतीबिंदू व नेत्रतपासणी, सवलतीच्या दरात ऑपरेशन व चष्मे वाटप, मोफत श्रम कार्ड असा भव्य कार्यक्रम राबविण्यात आला बहुसंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला सदर कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार सुरेशराव हाळवणकर ,आकाश मुल्ला,दस्तगीर बाणदार,मुनीर मुल्ला,साजिद शेख,सलीम माणगावे, मिश्रीलाल जाजू,सुनील महाजन, अनिलजी डाळ्या,बंडोपंत मुसळे, रसूल सय्यद, बद्रे आलम देसाई,अबूबकर मोमीन, शोभा वसवाडे,भागातील बहुसंख्य हिंदू मुस्लिम शिवभक्त हजर होते शेवटी आभार मुनिर मुल्ला यांनी मानले.