सर्वधर्मीय जयंती समिती व परिवर्तन फाउंडेशन तर्फे शिवजयंती साजरी
कोल्हापूर : (प्रतिनिधी) टाऊन हॉल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अॅड.धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी बोलताना अॅड. पठाडे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठी लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान अनन्यसाधारण आहे असे मनोगत अॅड. धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी डीवाय.एस.पी. आर.आर.पाटील,कळंबा जेल अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर,राज्य उत्पादन शुल्क एक्साईजचे डी.एस.पी. रवींद्र आवळे,एम.आय.डी.सी.चे अभियंता इराप्पा नाईक,ॲड.राहुल सडोलीकर,गजानन कुरणे,परिवर्तनचे अमोल कुरणे
,क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,
राज कुरणे,डाॅ.प्राजक्ता सूर्यवंशी,हाजी फिरोज सातारमेकर,निवास सूर्यवंशी,शरद कांबळे आदी उपस्थित होते.