शिवतीर्थ येथे शिवजयंती उत्साहात
कबनूर ता.१९-“रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कर्तुत्व दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे.”असे प्रतिपादन पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केले.
येथील मराठा समाज मंडळाच्यावतीने कोल्हापूर रस्त्याजवळील शिवतीर्थ येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार कोले,नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीचे माजी अध्यक्ष सुधाकरराव मणेरे उपस्थित होते.
मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.पाटील यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवतीर्थ मैदानाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार कोले यांच्याहस्ते करण्यात आले. गणेश सुतार यांनी ध्येयमंत्र म्हटले.नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीचे माजी अध्यक्ष सुधाकरराव मणेरे,जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील,व्यंकटेश सहकारी सूतगिरणीचे संचालक अशोकराव पाटील,उपसरपंच सुधीर पाटील,माजी सरपंच मधुकर मणेरे,प्रा.अशोक कांबळे,बी.जी. देशमुख,पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील,जवाहर सहकारी बँकेचे संचालक बबनराव केटकाळे,माजी उपसरपंच चंद्रकांत आडेकर,निलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी इचलकरंजी मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत,सुनील इंगवले,एन.एन.काझी, ग्रामपंचायत सदस्या अर्चना पाटील,वैशाली कदम,सुनिता अडके,रजनी गुरव,सुलोचना कट्टी,स्वाती काडाप्पा,रोहिणी स्वामी,सैफ मुजावर, भैय्या जाधव,ग्रामविकास अधिकारी जी.डी. आदलिंग,बाबासाहेब कोकणे,पैलवान अण्णाप्पा निंबाळकर,शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष अभिजीत खवरे,उपाध्यक्ष अजित खुडे,सचिव दत्ता पाटील, खजिनदार जयदीप इंगवले,प्रकाश इंगवले,स्वरूप पाटील,अल्ताफ मुजावर,शिवा चव्हाण, मुख्याध्यापक रवींद्र गांजवे,माजी मुख्याध्यापक मारुती आवळे,बाळासाहेब कामत,सुनील साळुंखे, उत्तम यादव,प्रणव नेसरीकर,किशोर पाटील,संजय कट्टी,रियाज चिकोडे,विकास फडतारे आदी उपस्थित होते.युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले.ब्रिज अकॅडमीचे प्रमुख प्रा.संदीप राणे यांनी आभार मानले.
फोटोओळ-
कबनूर-येथील शिवतीर्थ येथे शिवजयंती उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना पी.एम.पाटील,जयकुमार कोले आदी मान्यवर
Posted inकोल्हापूर
कबनूर शिवतीर्थ येथे शिवजयंती उत्साहात साजरी
