रत्नागिरी : मोहिनी मुरारी मयेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे सामाजिक शास्त्र विभाग आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्या स्नेहा पालये, संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोवाडा गायन करून महाराजांना मानवंदना केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या स्नेहा पालये यांनी मनोगतातून शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन आणि नेतृत्व यांचा आदर्श संपूर्ण जगाने घेवून आपल्या व्यवस्थेत महाराजांचे विचार सामावून घेतले आहेत. आपणही त्यांचा एखादा गुण आत्मसात करून प्रत्यक्षात विचार आचरणात आणावेत असे आवाहन त्यांनी केले.
प्राध्यापकीय मनोगतामध्ये प्रा. गणेश कुळकर्णी, प्रा. विक्रांत शिंदे यांनी शिवाजी महाराजांचे क्रांतिकारक विचार मांडले. प्राची निवळकर या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक श्री. सुरेंद्र माचिवले, प्राचार्या स्नेहा पालये, प्रा. अवनी नागले, प्रा. गणेश कुलकर्णी, प्रा. शामल करंडे, प्रा. विक्रांत शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुरूनाथ सुर्वे यांनी केले. शेवटी प्रा. कविता जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
कोरोनाचे नियम पाळून बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिवजयंती कार्यक्रम संपन्न झाला.