श्री शाहू छत्रपती मिल्स परिसर विकास समिती स्थापना – केंद्र व राज्याकडे धरणार आग्रह
कोल्हापूर – येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शाहू मिल्सच्या जागेवर राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे यथोचित स्मारक उभा करून उरर्वरीत जागेचा सामाजिक दृष्टिकोनातून विकास व्हावा या मागणीसाठी कोल्हापूरात श्री शाहू छत्रपती मिल्स परिसर विकास समिती या नावे एक समिती स्थापन करण्यात आली आहे त्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडे आ य आय टी सह विविध विकास प्रकल्पासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. यासाठी पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील चुयेकर यांनी पुढाकार घेतला असुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते या समितीचा नुकताच शुभारंभ करण्यात आला . या साठीच लक्ष्य वेधण्यासाठी समितीच्या वतीने शाहू मिल च्या प्रवेशद्वरावर रविवारी सर्व पक्षिय धरणे आंदोलन करण्यात आले . भाजप , शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी , शेकाप , माकप , मनसे आदिसह सर्व राजकिय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते . तसेच कोल्हापूरातील विविध व्यवसायिक संघटनांचे व सामजिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच शाहू प्रेमी जनतेने या धरणे आंदोलनात आपला उत्फुर्त सहभाग नोंदवला . यावेळी बोलताना माणिक पाटील- चुयेकर म्हणाले कि , सुमारे पंधरा वर्षापुर्वी मिल्सची जागा न विकता या जागेवर राजर्थि छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक उभा करणार असल्याची घोषणा तत्कालीन काँग्रेस सरकारने केली होती . परंतु आजवर या जागेवर कोणत्याही प्रकारचा विकास न झाल्याने राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे विचार मानणाऱ्या समस्त शाहू प्रेमी जनतेचा अपमान होत आहे . या जागेचा विकास राजशासनाच्या वतीने करण्यात येऊन यास केंद्रशासनाची आर्थिक मदत घेण्यात यावी , तसेच स्मारकासह संपूर्ण जागेचा विकास करुण येथील कामगारांच्या कुटुबियांना रोजगाराची संधी प्रधान्याने उपलब्ध करुण द्यावी . ललित गांधी यांनी शाहू मिल ची संपूर्ण जागा वापरात आणल्यास कोल्हापूरची पर्यटन व औद्यगीक विषयी मोठी प्रगती होईल असे सांगितले . या जागेवरील काही भागात आय . आय.टी कॉलेज सुरु करावे असे मागणी अॅड . बाबा इंदोलकर यांनी यावेळी केली . यावेळी माजी नगरसेवक बाबा पार्ट , अशोक भंडारे , अनिल कदम अशोक जाधव तसेच शाहू मॅरेथानचे किसन भोसले , रविंद्र मोरे , अनिल घाटगे , पद्माकर कापसे , शर्मिला सामंत , फिरोज मुजावर , विशाल देवकुळे , यांनी आपले विचार मांडले . राजेंद्र मकोटे , आजम जमादार ,तुषार भिवटे भैय्या शेटके , महादेव पाटील , जगन्नाथ नाईक , उमेश पोर्लेकर , प्रदिप शेलार , हेंमत पाटील , काका जाधव , दिलीप मेत्रानी , विजय पोळ , प्रकाश मोरे , सुरेश साळूंके , आकाश शेलार , हेंमत पाटील , काका जाधव , दिलीप मेत्रानी , रविंद्र मुदगी , किशोर घाटगे , ऐश्वर्या मुनिश्वर , प्रशांत अवघडे , विजय पोळ , प्रकाश मोरे , सुरेश साळूंके , आकाश शेलार , योगेश साळुंके , धनंजय दुगे , प्रशांत शिंदे , राहुल नष्टे , शरद तांबट , संदिप अधागे मोहन मोरे , मोहसिन मुल्ला , मिलन माने , अश्विन शेळके , सुभाष जाधव , निसार बल्लाटी , संजय सावंत , संजय ढवळे , फिरोज सौदागर , राजु शेख निसार बल्लारी , अरिफ मुजावर , गजानन लोखंडे आदि सह विविध संस्था चे पदाधिकारी – कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .