जवाहर कारखान्यावर नॅनो युरिया द्रवरूप खत प्रचार-प्रचार वाहनाचा शुभारंभ
इचलकरंजी/प्रतिनिधी –
युरिया खताची वाढती मागणी व पारंपारिक पध्दतीने शेतामध्ये खत टाकल्याने वाया जाणार्या युरियाचे प्रमाण पाहता इफको कंपनीने त्यावर पर्याय म्हणून द्रवरूप स्वरूपातील नॅनो युरिया लिक्वीड संशोधीत करून पिकावरील फवारणीसाठी उपलब्ध केले आहे. या नॅनो युरियाच्या प्रचार व प्रसाराकरिता इफको कंपनीनार्फत आलेल्या वाहनाच्या प्रचार व प्रसाराचा जवाहर साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शुभारंभ करण्यात आला.
सदरची 500 मि.ली. नॅनो युरिया लिक्वीड बॉटल ही 45 किलो युरिया गोणीस पर्याय असणार आहे. इफको नॅनो युरिया व इतर मार्गाद्वारे शोषला जाऊन वनस्पतीच्या पेशींमध्ये साठवला जातो. अन्ननलिकेद्वारे जेथे गरज आहे तेथे वाहून नेला जातो तसेच न वापरलेला नत्र हा वनस्पतीच्या पेशी पोकळीमध्ये साठवला जातो व वनस्पतीच्या जीवन चकामधिल वाढ व विकासासाठी गरजेनुसार पुरवला जातो. नॅनो युरियामध्ये नत्राच्या कणांचा आकार 20 ते 50 नॅनोमीटर इतका असतो. 1 नॅनोमीटर म्हणजे 1 मीटरचा 100 कोटींवा भाग. सध्या आपण वापरत असलेला बारीक युरियाची तुलना नैनो युरियासोबत केली तर बारीक युरियाचा 1 दाणा हा नॅनो युरियाच्या 55 हजार कणांइतका असतो. नॅनो युरियाचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे बारीक युरियापेक्षा 10 हजार पटीने जास्त असते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता जास्त असते.
नॅनो युरिया जमिनीमधून न देता पिकाला फवारणीद्वारे म्हणजेच पानांद्वारे देत असल्यामुळे युरियाचा जमिन व पाण्याशी डायरेक्ट संबंध येत नाही. कार्यक्षमता चांगली असल्यामुळे हवेमध्ये वाया जात नाही. त्यामुळे नॅनो युरिया पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीसाठी उपयोगी आहे. जैविक बायोस्टिमुलंट, 100 टक्के विद्राव्य खते आणि कृषि रसायनांसोबत मिसळून वापरता येते. नॅनो युरियाच्या प्रचार व प्रसाराकरिता इफको कंपनीनार्फत आलेल्या वाहनाचा जवाहर साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शुभारंभ व्हा व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, संचालक सर्वश्री आण्णासो गोटखिंडे, सूरज बेडगे, मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे, इफकोचे विभागीय अधिकारी, विजय बुनगे, अॅग्री ओव्हरसियर जयपाल गिरीबुवा व पंकज पाटील तसेच शेती मुख्यालय स्टाफ यांच्या उपस्थितीत झाला.
Posted inकोल्हापूर
जवाहर कारखान्यावर नॅनो युरिया द्रवरूप खत प्रचार-प्रचार वाहनाचा शुभारंभ
