रत्नागिरी | डोंगरावरील शेतीतूनही घेतले विक्रमी उत्पन्न

रत्नागिरी | डोंगरावरील शेतीतूनही घेतले विक्रमी उत्पन्न

चिपळूण : तालुक्यातील रेहेळे – भागाडी येथील एकनाथ सीताराम मोरे यांनी मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावी उत्तम शेतीचा मंत्र जपला आहे. आपल्या गावातील डोंगरावर असलेल्या पाच ते सहा एकर जमिनीवर ५५० काजू, १०० नारळ, १००० सागवान, ३०० पपई, केळी (वेलची), कलिंगड, मिरची, पावटा, वांगी यासह विविध आंतरपिकांची लागवड करत कोकणातील डोंगरावरही उत्तम शेती करून विक्रमी उत्त्पन्न मिळवता येते, हे दाखवून दिले आहे.

शेतीची आवड असणाऱ्या मोरे यांनी बीएमसीतून ५ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या गावी येणे पसंत केले. येथे आल्यानंतर त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेले शेतीचे प्रयोग पाहून शेतीला सुरवात केली. त्यांना कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले आहे. काजू, आंबा, नारळ, पेरू या फळझाडांची लागवड करत त्यामध्ये विविध नगदी उत्पन्न देणारी आंतरपिके लागवड करण्यास सुरवात केली. गतवर्षी त्यांनी पपईची लागवड करत स्वतः विक्री करून तब्बल ६ लाखांचे उत्पन्न घेतले.

कलिंगड लागवडीतून २ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांनी ५ किलोहून अधिक वजनाचे कलिंगड पिकवले असून त्यांच्या शेतात पिकवले जाणारे कलिंगड, पपई उत्तम दर्जाचे व खाण्यासाठी चवीचे असल्याचे मोरे सांगतात. गेली पाच वर्षे सातत्याने अत्यंत नियोजनबद्ध शेती करत त्यांनी शेतकरी व तरुणांसमोर उत्तम शेतीचा आदर्श घालून दिला आहे.एकनाथ मोरे यांची दोन्हीही मुले उच्च शिक्षित आहेत. मोठा मुलगा संकेत हा ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे तर धाकटा अनिकेत हा आय. टी. इंजिनिअर आहे.कोरोना काळात त्यांना शेतीच्या कामात मुलांचेही सहकार्य लाभले असून त्यांच्या पत्नी शुभांगी मोरे यांचीही साथ उत्तमरीत्या लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.दृष्टीक्षेपात५५० काजू, १०० नारळ, १००० साग, ३०० पपईस्वतः विक्री करून मिळवले नगदी ६ लाखकलिंगड लागवडीतून २ लाखांचे उत्पन्नआंतरपिकामुळे तेवढ्याच जागेत फायदानियोजनबद्ध पद्धतीने शेती केल्यास निश्चितच शेती लाभदायी व आनंद देणारी आहे. मात्र त्यामध्ये सातत्य व कष्टांची गरज आहे. शेतीला आधुनिकतेची जोडदेखील द्यावी लागते.-एकनाथ मोरे, प्रगतशील शेतकरी, रेहेळे-भागाडी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *