गेली 6 दशके इचलकरंजी मधे विविध सामाजिक कार्यां द्वारे शहरात आपला वेगळा ठसा उमटवीणाऱ्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे विविध विषयांवर जनजागृतीसाठी, रविवार दिनांक 20 फेब्रूवारी रोजी कारनामा 2022 कार ट्रेझर हंटचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये 13 संघांनी सहभाग घेतला होता. ट्रेझर हंट दरम्यान सर्वांना साक्षरता,अवयवदान,पाणी वाचवा, प्लास्टिक चा वापर टाळा, रक्तदान, नदी प्रदूषण, उत्तम आरोग्या साठी योगा,खेलो इंडिया खेलो, वाहतुकीचे नियम पाळा,ध्वनी प्रदूषण,लेक वाचवा, झाड़े वाचवा, झाड़े लावा,स्वछ भारत या विषयांवर सामाजिक संदेश पोहोचवायचा होता.सर्व संघांनी कारची सुंदर सजावट करून व सर्जनशील पथनाट्य सादरीकरण करून शहरवासियांची मने जिंकली. मनोरंजनासोबतच सामाजिक कार्यही करता येते,याचा अनोखा आदर्श लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीने मांडला आहे असे प्रतिपादन अध्यक्ष ला. लक्ष्मीकांत भट्टड़ यानी केले. सदरचा अत्यंत अभिनव प्रकल्प ला. मधु धूत व ला. राकेश धूत यांच्या संकल्पनेतुन संपन्न झाला. सदर कार्यक्रम संपन्न करने साठी क्लब चे सेक्रेटरी ला. शैलेंद्र जैन, खजिनदार ला. महेंद्र बालर तसेच जानेवारी फेब्रूवारी लेडीज विंग च्या ला. कनक भट्टड़,ला. श्रुतिका भंडारी, ला.गायत्री मर्दा ,ला.रेखा मंत्री यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमास झोन चेअरमन ला. महेश सारडा व अन्य लायन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. एरोनर टेक्नोलॉजी चे नरेश काबरा यांचे विशेष सहकारी या स्पर्धेसाठी लाभले.सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून एड.दिलशाद मुजावर व अखिल बाहेती यानी काम पाहिले.
Posted inकोल्हापूर
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी चा एक आगळा वेगळा उपक्रम “कारनामा 2022”.
