कर्मयोगी श्रीधरराव देशमुख यांचा जयंतीउत्सव उत्साहात संपन्न
ग्रामीण विकासासाठी श्रीधरबाप्पू सारखे भगीरथ जन्माला यावे लागते – माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे
श्रीधरबाप्पू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या व्याख्येतील माणूस – हेमंत काळमेघ
श्रीधरबाप्पू ग्रामविकासाला सर्वस्व अर्पण करणारा ग्रामनाथ – माजी मंत्री. अझहर हुसेन
ग्रामविकासाचा महापुरुष म्हणजेच श्रीधरबाप्पू देशमुख – आमदार किरण सरनाईक
श्रीधर पर्वाच्या उद्घाटननाने शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ
अकोला- अकोला जिल्ह्यात निंबा परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, ग्रामीण विकास आणि विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याने कर्मयोगी ठरलेल्या स्व. श्रीधराव उपाख्य ‘मालक’ यांचा ९९ वा जयंतीउत्सव तसेच श्रीधर पर्वाचे उद्घाटन काल निंबा येथे संपन्न झाला. अतिथींच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांच्या ‘मानवतेचे दुसरे नांव श्रीधरराव…श्रीधरराव’ या हृदयस्पर्शी लक्षवेधक समूहगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, माजी आमदार श्री नरेशचंद्र ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली व शिक्षक आमदार श्री किरणराव सरनाईक, शिवाजी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात जन्मशताब्दी महोत्सव समिती सचिव श्री हेमंत काळमेघ यांनी आपल्या प्रस्ताविकातून बाप्पूंच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या जयंतीदिनी जन्माला आलेल्या स्व. श्रीधरराव बापूंचे कार्य हे स्व.भाऊसाहेबांच्या कार्यासारखेच प्रचंड होते. निंबा परिसराला मुलभूत विकासामध्ये अग्रेसर ठेऊन गोरगरीबांच्या केलेल्या सेवेमुळेच त्यांना आदरयुक्त प्रेमाने मालक ही पदवी बहाल करण्यात आली होती. आध्यात्म संगीताची आवड, तुकारामादी संत साहित्त्याचा अभ्यास आणि त्यानुरूप वाटचाल करणारे असे हे भेदभाववारहीत सर्वधर्मसमभावी चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व होते.त्यामुळे स्व.भाऊसाहेबांना अपेक्षित असलेला विद्यार्थी घडविण्याचे खरे कार्य मालकांनी स्थापन केलेल्या निंब्याच्या शाळेतून सुरू आहे. अशा थोर कर्मयोग्यांचे जीवनकार्य एक आदर्श म्हणून नव्या पिढीसमोर मोठ्या प्रमाणात आले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.
प्रा. श्री मोहन खडसे आणि श्री रमेश रोठे यांच्या सुत्रसंचनाखाली झालेल्या या कार्यक्रमात स्व.बाप्पूंच्या सोबत त्याकाळात राहिलेले माजी मंत्री श्री अजहर हूसेन यांनी जुण्या स्मृतींना उजाळा दिला, आमदार रणधीर सावरकर, श्री केशवराव मेतकर, श्री लक्ष्मणराव तायडे यांनीही मनोगते व्यक्त केली, तर श्री. नरेशचंद्र ठाकरे यांनी अध्यक्षिय भाषणातून स्व. श्रीधराव देशमुख यांचे यांचे स्वप्नवत वरिष्ठ महाविद्यालय सुरू होत असल्याने मालकांचे स्वप्न पूर्ण केल्याने समाधान व्यक्त केले तसेच, सर्वच क्षेत्रातील अफाट कार्याने त्यांच्या स्मृती अजरामर ठरल्याचे सांगून त्यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. सध्यस्थितीत संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने नवीन महाविद्यालये किंवा जिथे निधीची आवश्यकता आहे तेथे संस्था मर्यदित स्वरूपात मदत करू शकते याबाद्दल सुद्धा समाधान व्यक्त केले त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांनीही श्रीधरावजी देशमुखांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
वर्षभरातील आयोजित श्रीधरपर्वात विविध कार्यक्रमाने जन्मशताब्दी वर्ष आणि २३ फेब्रू २०२३ रोजी त्यांची १०० वी जयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार नितीन देशमुख, श्री केशवराव गावंडे, श्री शिरीष धोत्रे, मनोज महाजन, महेश /गणगणे, उमेश जाधव, रामेश्वराव वाकळे, बाळगंगाधर वैराळे, रमेशराव सातारकर, श्री. सुरेशराव आढे, भास्कराव पाटील, पुरूषोत्तमजी दहे, भानुदास उंबरकर, विनायकराव लांडे, कृष्णराव श्री. देशमुख, पोलास पाटील प्रमोद देशमुख, पत्रकार संजय एम. देशमुख, गणेश देशमुख, ज्योतीताई सोनोने(सरपंच), सौ. अंजली तायडे, धम्मपाल तायडे, प्रा. गजानन भारसाकळे, उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्राचार्य श्री विजय ठोकळ यांनी केले. या कार्यक्रमाला आणि बाप्पूंना अभिवादन करण्यासाठी निंबा व परिसरातील आणि बाहेगावाहून आलेले प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी विद्यालयाचे आजी माजी शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.