… अन् नागराजने बाबासाहेबांना बॉलिवूडच्या कोर्टरूम मधून बाहेर आणले

… अन् नागराजने बाबासाहेबांना बॉलिवूडच्या कोर्टरूम मधून बाहेर आणले

 ‘पिस्तुल्या’, ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ अशा एकापेक्षा एक कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. नागराज बॉलिवूड मध्ये एन्ट्री करणार, ‘बिग बी’ अमिताभ बच्चन नागराजच्या सिनेमात झळकणार या उत्सुकतेपोटी सुरू असलेल्या चर्चा ‘झुंड’ चा टीझर आणि ‘आया ये झुंड है’ हे गाणे आणल्यानंतर वैविध्यपूर्ण अंगाने होऊ लागल्या आहेत. बॉलिवूडचा शहेनशह चित्रपटात आहे म्हणून नाही तर नागराजच्या ‘झुंड’ मध्ये दिसत असलेल्या ‘कंटेट’ साठी आम्ही सिनेमा बघणार असे प्रेक्षक नागराजच्या सोशल मीडिया वॉलवर लिहीत आहेत. आज ‘झुंड’ चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर त्यावर लाइक आणि कमेंटसची बरसात होत आहे. ‘झुंड’च्या ट्रेलर बद्दल एका वाक्यात सांगायचे म्हणजे ‘… अन् नागराजने बाबासाहेबांना बॉलीवूडच्या कोर्टरूम मधून बाहेर आणले’.

‘कंटेट’ च्या बढाया मारणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीने आजपर्यंत भारतीय राज्यघटणेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची, विचारांची कधीही दखल घेतली गेली नाही. अलीकडे दाक्षिणात्य इंडस्ट्री मध्ये ‘जयभीम’, ‘काला’. ‘कबाली’, ‘असुरण’ अशा मेनस्ट्रीम कलाकार असलेल्या चित्रपटांमधून बाबसाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे, त्यांचे महत्व पटवून देण्याचे प्रयत्न करण्यात आले. बॉक्स ऑफिसवर करोडो रुपयांची कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटात मात्र कोर्टरूम मध्ये लटकवलेल्या फोटो मधले डॉ. बाबासाहेब आंबेडकर कथेत प्रतिबिंबित होताना दिसले नाहीत. दिग्दर्शक नागारज मंजुळे यांनी हे धाडस करत ‘भीमजयंती’ बिगस्क्रीनवर दाखवत ‘बडी फिल्म, बडे पर्देपर’ हे म्हणणे सार्थ ठरविले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट येत्या 4 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *