मुंबई : रशिया व युक्रेन यांच्यातील वादामुळे भारतीय शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स 2702.15 अंकांनी किंवा 4.72 टक्क्यांच्या घसरणीसह 54529.91 अंकांवर बंद झाला. निफ्टी 815.30 अंक किंवा 4.78 अंकांच्या घसरणीसह 16248 अंकांवर बंद झाला.
भारतीय शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 10 लाख कोटींचे नुकसान झाले. निफ्टीचे सर्वच्या सर्व 50 शेअर्स हे ‘रेड झोन’मध्ये गेले, तर ‘सेन्सेक्स’च्याही 30 शेअर्सला मोठा फटका बसला.
बँकिंग व आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. टाटा मोटर्स, इंडस इंड बॅंक, यूपीएल, अदानी पोर्टस्, ग्रासीम इंडस्ट्रिज् या शेअर्सचे सर्वाधिक नुकसान झाले. निफ्टी बँकमध्ये 5.79 टक्क्यांची, निफ्टी आयटीमध्ये 4.59 टक्क्यांची, स्मॉल कॅपमध्ये 5.77 टक्क्यांची घसरण झाली.
इंधनाचे दर वाढण्याची शक्यता
जागतिक बाजारात गुरुवारी क्रूड ऑईलची किंमत 100 डॉलर प्रति बॅरलवर गेली. गेल्या 8 वर्षांत पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती विक्रमी स्तरावर गेल्या असून, त्याचा थेट फटका इंधनाच्या दरांवरही होणार, हे नक्की..!