मुंबई : नवाब मलिक यांच्या अटकेसाठी भाजप नेत्यांकडून आज मुंबईत आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी ईडीच्या कारवाया होणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
नवाब मलिकांच्या केसमध्ये हा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा प्रकार असल्याचं सांगत त्यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही मविआ नेत्यांची यादी जाहीर केली. यातील अनेकांवर लवकरच कारवाई होणार असल्याचं पाटील म्हणाले.
दरम्यान, आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून आंदोलन करण्यात आले. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयाजवळ आंदोलन केलं. तर, मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात केलं. यावेळी भाजपचे विविध नेते उपस्थित होते. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी लवकरच आणखी काही मविआ नेत्यांवर ईडीची कारवाई होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.