महाराष्ट्रातील सहा शिक्षकांचा केंद्र शासनाच्यावतीने होणार सन्मान

महाराष्ट्रातील सहा शिक्षकांचा केंद्र शासनाच्यावतीने होणार सन्मान

⭕️28 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे होणार सन्मान सोहळा.

केंद्र सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युके शनल टेक्नॉलॉजीकडून (सीआयईटी) शिक्षकांसाठीचे राष्ट्रीय पातळीवरील आयसीटी पुरस्काराचे वितरण दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांचे पुरस्कारांचे वितरण होणार असून यात राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील सहा शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे.
एनसीआरटी नवी दिल्ली यांच्या वतीने देशातील शिक्षकांना विविध शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात .या वर्षी सन 2018 आणि 2019 या वर्षीचे हे ICT पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
संपूर्ण देशातील 28 राज्ये आणि केंद्रशाशीत प्रदेश यांच्यातील 205 शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या त्यामधून राज्यातील दोन वर्षांच्या 6 शिक्षकांना हा ICT पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करणाऱ्या शिक्षकांना आयसीटी पुरस्कार देण्यात येतात. २०१८ साठी देशभरातील २५ शिक्षकांची, २०१९ साठी देशभरातील २४ शिक्षकांची निवड करण्यात आली. राज्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये

2018 साठीच्या ICT पुरस्कार प्राप्त शिक्षक

  1. नागनाथ शंकर विभूते – पुणे
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभूळदरा
    ता.खेड जि. पुणे
  2. आनंद बालाजी अनेमवाड-पालघर
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मल्याण मराठी, डहाणू
    ता. डहाणू जि. पालघर
  3. उमेश रघुनाथ खोसे-उस्मानाबाद
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर, कडदोरा
    ता. उमरगा जि. उस्मानाबाद

2019 साठीचे पुरस्कार प्राप्त शिक्षक

  1. मृणाल नंदकिशोर गांजळे-पुणे
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे
    ता. अंबेगाव जि. पुणे
  2. प्रकाश लोटन चव्हाण-नाशिक
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजवण
    ता. दिंडोरी जि. नाशिक
  3. शफी अजीज शेख – यवतमाळ
    जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा बिटरगाव ( बु.)
    ता.उमरखेड जि. यवतमाळ

उस्मानाबाद उमेश रघुनाथ खोसे यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने व राष्ट्रीय आय.सी.टी.पुरस्काराने एकाच वर्षात सन्मान होणार आहे.

विशेषत:,सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांनी आयसीटी पुरस्कारांमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. सदरील शिक्षकांना दि. २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२२ पर्यंत हा सन्मान सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. हा सन्मान सोहळ्याचे ऑनलाईन पद्धतिने प्रक्षेपण होणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *