आलास मतदार संघात मुस्लिम सेनेचे अध्यक्ष समीर पटेल जिल्हा परिषद निवडणूक लढवून रंगत आणणार असल्याचे चित्र सध्या या मतदारसंघात निर्माण झाले आहे त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे
औरवाड (प्रतिनिधी)आलास मतदार संघ या ना त्या कारणाने कायम चर्चेत राहिला आहे या मतदार संघात शौकत पटेल या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे . तसेच धैर्यशील माने आणि आलासचे दादामिया पठाण यांनी रंगत आणून संपूर्ण महाराष्ट्रांचे लक्ष वेधले गेले होते त्यामुळे या मतदार संघाला खूप महत्व आहे या मतदार संघातील नेर्तृत्व सध्या सौ परवीन भाभी पटेल यांच्या कडे आहे इतकेच नव्हे तर या मतदार संघात पटेल यांचेच प्रभाव आहे असे म्हणतात त्यामुळे या मतदार संघात पटेल याचीच कमांड आहे म्हणून पटेल यांनाच डिमांड आहे. सौ परवीन पटेल यांनी या ठिकाणी विकासाची कामे करून घेतली आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळाली तर तेही या ठिकाणी दावा करू शकतात .तसेच मुस्लीम सेनेचे अध्यक्ष समीर पटेल यांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने छेडून मतदारांचा पाठिंबा आणि आशीर्वाद घेण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांनाही वाढता पाठिंबा मिळाला आहे तसेच शैक्षणिक, आरोग्य, गटार, सडक, व बेकायदेशीर माती ,वाळू ,अवैध धंदे यावर आंदोलन छेडल्याने त्यांच्यावर हल्लाही झाला आहे हेही या मतदारसंघाने विसरून चालणार नाही त्यामुळे निवडणूक लढविण्याचा मतदार संघात मतदारांकडून पसंती आहे त्यांनी काँग्रेस ,राष्टावादी,भाजपा, शिवसेना,स्वाभिमानी वंचित कोणाशीही युती करण्याची त्यांना मुभा आहे पाहू या ते कसे या मतदार संघात रंगत आणतात.