मुंबईतील शाळा विद्यार्थ्यांने गजबजल्या.
राज्यातील कोरोनाचा कमी झालेला प्रभाव व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ व शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यास मान. मनपा आयुक्त यांची संदर्भ क्र. 14 अन्वये मंजुरी प्राप्त झाली. व आज मुंबई शहरातील सर्व शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. मुलाचा उत्साह व मित्रांना बर्याच दिवसांनी भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसडंत होता.
शाळा सुरू करताना विशेष सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
- कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेऊन मान. मनपा आयुक्त यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या शाळा बंद अथवा सुरु करण्याबाबत यापूर्वी निर्गमीत करण्यात आलेली सर्व कोविड 19 आरोग्य विषयक सुचनांचे पालन करावे.
- दि. 2 मार्च 2022 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा कोव्हीड -19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु कराव्यात.
- विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळासुद्धा ऑफलाईन पद्धतीने पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यात याव्यात.
- विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी. 5. शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांची उपस्थिती 100% असणे आवश्यक आहे
. 6. शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांचे 100% लसीकरण करावे.
- कोव्हीड -19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गाच्या तासामध्ये मैदानी खेळ, शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत व या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे.
- वर्गाध्यापन, स्कूलबस / स्कूलव्हॅन मध्ये व शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल परंतु मैदानी खेळ, शारिरीक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल.
- कोव्हीड -19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल.
- विद्यार्थ्यांसाठी लसीकरण अत्यंत सुरक्षित असून तज्ञांच्या सल्ल्याने त्याची निश्चिती करण्यात त्याअनुषंगाने पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांचे 100% लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रशासकीयलसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी
(शाळा), आरोग्य अधिकारी व विभागीय सहा. आयुक्त यांनी समन्वय साधून विशेष शिबिरांचे आयोजन शाळांमध्ये करण्यात यावे.
- वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले कोमॉर्बिडिटीज व क्रॉनिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्र आवश्यक असेल.
- कोव्हीड 19 सदृश्य लक्षणे (उदा. सर्दी, खोकला, घसादुखणे व ताप इ.) आढळल्यास पालकांनी विद्यार्थ्याला शाळेत पाठवू नये. .
- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यस्थापनांच्या पूर्णक्षमतेने शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याकरीता खाजगी बससेवा व बेस्ट बसमधून पूर्णक्षमतेने प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी.
सर्व शाळांनी उपरोक्त मुद्दा क्र.1 ते 13 येथील सुचनांनुसार कार्यवाही करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.