मुंबई :- एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबतचा त्री सदस्यीय समितीचा अहवाल परिवहन मंत्री अनिल परब उद्या दि.३ मार्च रोजी पटलावर ठेवणार आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सादर करण्यात आलेल्या अहवालीची नोंद घेण्यात आल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले असून, यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सादर करण्यात आलेल्या अहवालात एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असणारा कर्मचाऱ्यांचा संप मिटणार की सुरूच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हायकोर्टाच्या निर्देशानंतर सरकारने स्थापन केलेल्या तीन सदस्यीस समितीचा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांनी वरील माहिती दिली आहे.
जवळपास तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे आदींसह इतर मागण्यांवर संप पुकारला असून, त्यापैकी विलीनीकरणाची मागणी वगळता इतर सर्व मागण्यांवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.