रत्नागिरी /जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध धंद्यांची गोपनिय माहीती देण्यासाठी व्हाटसअॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हयातून दारु, जुगार, मटका, गुटखा, गांजा, चरस तसेच इतर अवैध धंद्यांचे जिल्हयातून समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने व तक्रारदार नागरीकांच्या सोयीच्या दृष्टीने जिल्हा स्तरावर व्हाट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील अवैध धंद्यांवर आता नागरिकांनी वॉच ठेवावा. अशा स्वरूपाची संकल्पना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणार आहे.
रत्नागिरी पोलिस दलाकडून दिलेल्या संपर्क क्रमांकावर अवैध धंदयांबाबत जिल्हयातील कोणतेही नागरीक व्हाट्सअॅपव्दारे तक्रार नोंदवू शकतात. पोलीसांकडून तक्रारदाराची संपुर्ण माहिती गोपनिय ठेवण्यात येईल. त्यामुळे अवैध धंदयाबाबत तक्रार देण्यासाठी नागरीकांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले असून त्याआधारे जिल्हयातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्यास पोलीसांना मोठी मदत होणार आहे. गोपनिय माहितीकरीता व्हाट्सअॅप क्रमांक ८२६३८८३३१९ आहे.