भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळात भारताने ६बाद ३५७ धाव केल्या असून जडेजा ४५ तर अश्विन १० धावांवर नाबाद आहेत . मात्र यष्टीरक्षक ऋषभ पंत याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले.
आज मोहाली मध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली कप्तान रोहित शर्मा याचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवीत दिवसाखेर साडेतीनशेचा टप्पा गाठून दिला रोहित शर्मा आणि माया अग्रवाल यांनी सुरुवात करून अर्धशतकी सलामी दिली मात्र रोहित शर्मा २९ धावांवर बाद झाला कुमारच्या गोलंदाजीवर श्लेमलने त्याचा झेल घेतला तर दुसरा सलामीवीर माया अग्रवाल याने ४९ चेंडूत ३३ पाच चौकारांच्या साहाय्याने ३३ धाव केल्या त्याला एम्बुलदेलियाने पायचीत केले. त्यानंतर हनुमा विहारी आणि शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहली याची जोडी जमली दोघांनी ९० धावांची भागीदारी केली. विराट कोहली याच्यासाठी हा सामना खूपच महत्वाचा असल्याने त्याच्याकडून मोठ्या असुरक्षा होत्या. विराट शंभराव्या सामन्यात शतकी खेळी करील असे वाटले होते, पण ४५ धावांवर एम्बुलदेलियाने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी आलेले विराटाचे असंख्य चाहते निराश झाले. दुसरीकडे बऱ्याच प्रतीक्षेनंतर संधी मिळालेल्या हनुमा विहिरीने अर्धशतक झळकावले. पंतो ५८ धावांवर असताना फेमांडोने त्याला त्रिफळाचित केले.
त्यानंतर वृषभ पंत आणि श्रेयस अय्यर या पीच हीटर फलंदाजांची जोडी जमली दोघेही चांगली फटकेबाजी करीत होते. पण डिसील्वाने अय्यरला २७ धावांवर पायचीत केले. तोवर भारताने सव्वा तीनशेच्या टप्पा पार केला होता. पंत फटकेबाजी करीत होता. त्याने ९ चौकार आणि चार षटकार ठोकले पण शतकाच्या अगदी जवळ म्हणजे ९६ धावांवर असताना फटकेबाजीच्या नादात असताना तो चुकला आणि श्लेमलने त्याचा त्रिफळा उडवला. दरम्यान आजचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारताने ६ बाद ३५७ अशी चांगली आणि समाधानकारक धावसंख्या उभारली आहे. आज पहिल्या दिवशी तरी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा फारसा प्रभाव जाणवला नाही.