सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धात युक्रेनच्या दोन फुटबॉल खेळाडूंचा मृत्यू झाला असून काही खेळाडू बेपत्ता आहेत. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबवा अशी मागणी जगभरातील खेळाडू करीत आहेत.
प्रोफेशनल फुटबॉल खेळाडूंची संघटना फिफाचे सरचिटणीस योनास बेयर होपमेन यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे वीताली सेपिलो आणि दमित्रो मार्टिनो या दोन फुटबॉल खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे युक्रेनच्या क्रीडा विश्वाचे मोठे नुकसान झाले असून आम्ही रशियन हल्ल्याचा निषेध करीत आहोत. रशियाच्या या हल्ल्याचा जगभरातील क्रीडा संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केला असून फिफा आणि युएफा या दोनी संघटनांनी रशियावर बंदी घातलेली असल्याने रशिया पाठोपाठ रशियाला पाठिंबा देणाऱ्या बेलारुसच्या विरोधातही आता क्रीडा संघटना आक्रमक झाल्या असून बेलारुस वरही बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.