कबनूर ग्रामपंचायत जलस्वराज पाणीपुरवठा पूर्ववत सुरू
कबनूर- ( प्रतिनिधी चंदुलाल फकीर) महावितरणाच्या सुमारे दोन कोटी थकबाकी पोटी कबनूर येथील जलस्वराज प्रकल्पाची महावितरण कार्यालयाने ४ दिवसापूर्वी वीज खंडित केलेली होती.गावातील नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडालेली होती. ग्रामपंचायतने तातडीने वीस लाख रुपये जमा केलेवर वीज सुरू करण्यास महावितरणने स्पष्टपणे नकार दिला.त्यामुळे आणखीन विस लाखाची व्यवस्था करून ४० लाख रुपयांचा भरणा झालेनंतर महावितरणने खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला. कबनूरचा उरूस तब्बल तीन वर्षांनी भरत आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मार्फत चाळीस लाख रुपयांची तजवीज करून खंडित वीज पुरवठा सुरू करून घेतलेला आहे त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी नंतर गावात पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे .आतातरी नागरिकांचे पाण्यामुळे होणारे हाल थांबलेले आहेत.
Posted inBlog