स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कबनूर येथे चक्का जाम आंदोलन
कबनूर -(प्रतिनिधी चंदुलाल फकीर) शेतीपंपाला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व कबनूर मधील शेतकरी यांनी कबनूर दर्गा समोरील चौकात रस्ता रोको करुन चक्काजाम आंदोलन केले.दिवसा दहा तास लाईट मिळावी यासाठी कोल्हापुर वीज वितरण कार्यालय येथे माजी खासदार राजू शेट्टी गेली दहा दिवस बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला महा विकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून या विरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ४ मार्च रोजी महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन सुरू केले पोलीस बंदोबस्तात कबनूर येथे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रांतिक सदस्य जयकुमार कोले यांचे नेत्रत्वाखाली रस्ता रोको करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यानंतर कोले यांनी परखड मत व्यक्त केले.सर्व शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसले होते. रस्ता रोको करणाऱ्यां आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जयकुमार कोले, मिलिंद कोले, सुभाष सुतार,गोवर्धन दबडे, महावीर लिगाडे,धुळुसे पाटील,सतीश मगदूम,सुजाण शिरगुप्पे,आण्णा भाऊ कोले,विकास चौगुले कबनूर मधील असंख्य शेतकरी व स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे सुरू केलेल्या धरणे आंदोलनस कबनूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.