ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला अहवाल नाकारण्यात आल्याने, पुढील निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू नसणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टामुळे रद्द झाले. असा खोटा आरोप भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
यावेळी आंबेडकर असेही म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हेच पक्ष आहेत. तेव्हा या चार पक्षांना येत्या निवडणुकीत ओबीसींनी मतदान करू नये. सर्वोच्च न्यायालयात जो अहवाल सादर केला. त्याबाबत कुठलेच संशोधन झालेले नव्हते. त्यामुळे न्यायालयाकडून तो फेटाळण्यात आला. आणि त्यास भाजपच जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखविले.