देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. सुप्रीम कोर्टाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारल्यामुळे हा राज्य सरकारसाठी एक मोठा झटका आहे. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. यावरुन राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकार आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देवेंद्र फडवणीस आणि इतर भाजप नेत्यांनी मगरीचे अश्रू दाखवत रडण्याचे नाटक करू नये. तसेच, तीन पक्षांच्या या सरकारला ओबीसी आरक्षणाचे काही देणंघेणं नाही. हे तीन ही पक्षाने ओबीस आरक्षण रद्द होण्यास जबाबदार आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडक यांनी नांदेड मध्ये बोलताना टीका केली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी नवाब मलिक यांच्या प्रकरणावर सुद्धा भाष्य केले आहे.
नवाब मलिक यांनी आरोप झाल्यामुळे राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवे, असे मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. यापूर्वी देखील देशात अनेकांवर आरोप झाले होते. मात्र,त्या नेत्यांनी राजीनामा दिला होता, अशी आठवण आंबेडकर यांनी करून दिलीय. भाजपला आरक्षण संपवून समान नागरी कायदा आणयाचा आहे अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली, त्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी प्रत्युत्तर दिलय. आरक्षण आणि समान नागरी कायद्याचा संबंध आहे का, काहीही वक्तव्य करतात असे वक्तव्य त्यावर आंबेडकर यांनी केलय.