रत्नागिरी/ जिल्हा प्रतिनिधी
शनिवार, दि. 4 मार्च रोजी कला- वाणिज्य मयेकर महाविद्यालय चाफे येथे अंधश्रध्दा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून अंनिसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक खानविलकर व रत्नागिरी जिल्हा सहसचिव सुशील पवार उपस्थित होते.
आपल्या मनोगतातून समाजमनाला वर्षानुवर्षे पोखरून टाकणारी हि अंधश्रध्दा व्याधी नष्ट करायची असेल तर समाजिक प्रबोधनाची गरज आहे. अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती हे काम शाळा- महाविद्यालयात सातत्याने करत असते.
लोकांमधील अंधश्रध्दा दूर व्हावी व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी प्राध्यापक खानविलकर यांनी जादूटोणाविरोधी कायदा व कायद्यातील अनुसूची या विषयांवर प्रबोधन केले. हा लढा देवा धर्माच्या नावावर सामान्य जनतेचे शोषण करणाऱ्या लुबाडणाऱ्या विरुद्ध आहे. समाजातल्या अंधश्रध्दा प्रबोधनाद्वारे दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे व संविधानिक स्वातंत्र ,समता,बंधुता स्वीकारणारा आनंदी समाज निर्माण करणे. असा संदेश प्राध्यापक खानविलकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच सुशील पवार यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चमत्काराचे प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यासह प्राचार्य स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी,आजीवन अध्ययन, विस्तार विभाग प्रमुख राजेश धावडे, विभाग सहाय्यक प्रा कविता जाधव, प्रा. विक्रांत शिंदे, प्रा.शामल कारंडे, प्रा.अवनी नागले आदी उपस्थित होते.