आरोग्य राज्यमंत्री ना. मा. श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भरघोस निधीतून विविध विकास कामांना सुरुवात.
नवे दानवाड ता.शिरोळ येथे गेले अनेक वर्षांपासून वसंत राव नाईक वस्ती मध्ये रस्ताचे नागरिकांना गैरसोय होत होती. नागरिकांनी मोठ्या प्रमाण गेले अनेक वर्षे अनेक विविध लोकप्रतिनिधी कडून तेथील रस्ते विकास करण्याची मागणी केली होती पण यश आले नव्हते. राज्यमंत्री श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या 2515 निधी मधून 20 लाख इतकी निधी मंजूर होऊन प्रत्येक्षात रस्ता व गटारीचे विकास काम सुरू आहे. गावातील सांडपाणी गटारी मार्फत गावाबाहेर नेहण्या साठी मुख्य गटार नसल्या कारणाने उपगटार करणे सरपंच ग्रामपंचायतीस अवघड झाले होते. मंत्री यांच्या समोर हा प्रश्न मांडताच त्यांनी त्यासाठी भरघोस निधी मजूर केला. या सर्व कामाचा नागरिका मधून मोठ्या प्रमाणत समाधान व्यक्त होत आहे.
श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार झाल्या पासून नवे दानवाड गावास विविध विकास कामस निधीची कमतरता भासत नाही. आमदार झाल्या पासून 1 कोटी हून अधिक विविध विकास काम नवे दानवाड नगरी मध्ये झाले आहे असे प्रतिपादन गावचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती. वंदना हरिश्चंद्र कांबळे यांनी व्यक्त केला. विशेष पाठपुरावा व सहकार्य राहुल राज कांबळे यांचा लाभला आहे. सर्वच ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या कडून समाधान व्यक्त होत आहे.
Posted inकोल्हापूर
आरोग्य राज्यमंत्री ना. मा. श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भरघोस निधीतून विविध विकास कामांना सुरुवात.
