IND vs SL 1st Test: भारताचा श्रीलंकेवर २२२ धावांनी विजय

IND vs SL 1st Test: भारताचा श्रीलंकेवर २२२ धावांनी विजय

IND vs SL 1st Test: भारताचा श्रीलंकेवर २२२ धावांनी विजय

मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला. रवींद्र जाडेजाच्या नाबाद 175 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव आठ बाद 574 धावांवर घोषित केला. रवींद्र जाडेजाना दोन्ही डावात मिळून एकूण नऊ विकेट घेतल्या. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोशिएशच्या हळूहळू फिरकीला अनुकूल होत जाणाऱ्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. आज कसोटीच्या तिसऱ्यादिवशी कालच्या चार बाद 108 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ 174 धावात ऑलआऊट झाला. श्रीलंकेच्या उर्वरित सहा फलंदाजांनी फक्त 66 धावांची भर घातली.

पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव फक्त १७४ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन तर मोहम्मद शमीने १ विकेट घेतली. भारताकडे पहिल्या डावात ४०० धावांची आघाडी होती. त्यामुळे श्रीलंकेला फॉलोऑन देण्यात आला. पण दुसऱ्या डावात देखील श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. आर अश्विनने तिसऱ्या षटकात लंकेला पहिला धक्का दिला आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट पडत गेली. दुसऱ्या डावात विकेटकीपर निरोशन डिक्वेल्ला वगळता लंकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर अधिक वेळ थांबता आले नाही. डिक्वेल्लाने नाबाद ५१ धावा केल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *