मेघडंबरीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या निषेधार्थ वंचितच्या कार्यकर्त्यांकडून महापौर कार्यालयात शाईफेक
पुणे : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा एक तुकडा आज पडला. यावरून मेघडंबरी काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट आहे. या निषेधार्थ एकीकडे राष्ट्रवादीने केलेल्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर मुरलीधर मोहोळ कार्यालयात जावून शाईफेक करीत आपला निषेध व्यक्त केला आहे.
भाजपने शक्ती प्रदर्शन करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मेघडंबरी काम महापौरांनी घाईघाईत करून घेतले. त्यामुळे हा प्रकार घडल्याची विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी निवडणूक काळातही हा चर्चेचा विषय ठरणार आहे.