पाकिस्तानविरूद्ध विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंच होतंय कौतुक; वीरू अन् भज्जीनेही गायले गुनगाण
भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला विश्वचषकाचा पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने (India Womens Team) पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली आहे. भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत ७ विकेट गमावत २४४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ ४३ षटकांमध्ये १३७ धावांत सर्वबाद झाला. यानंतर अनेक चाहत्यांसह खेळाडूंनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात हा ११वा विजय आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारत-पाकिस्तान महिला संघाने ४ सामने खेळले आहेत. यांपैकी ४ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. आजपर्यंत पाकिस्तान महिला संघाने भारतीय महिला संघाला विश्वचषकात सुद्धा पराभूत केले नाही. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त विजय नोंदवला आहे. भारतीय महिला संघाच्या खेळाडूंनी संघाच्या या विजयाबाबत ट्विटरवर ट्वीट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने भारतीय संघाच्या विजयाचे खूप कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानला पूर्णपणे धुतले. पाकिस्तानी चाहते या सामन्यानंतर निराश दिसत आहेत. काही चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया ट्विटरवर दिल्या आहेत. यावर व्हीव्हीएस लक्ष्मणने सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत.