‘झुंड’ च्या कलेक्शन मध्ये दुप्पटीने वाढ
नागराज मंजुळे दिग्नदर्शक ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात 6.50 कोटी रुपये कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी 1. 50 कोटी कमाई केली होती. आता तर या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दुपटीने वाढ होत आहे. शनिवारी 2.10 कोटी आणि रविवारी पुन्हा 2.10 कोटी रुपये अशी चांगलीच कमाई केली आहे.
दरम्यान , ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्नदर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. झुंड हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे.