डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वधर्मिय जयंती समितीच्या अध्यक्षपदी गजानन कुरणे व कार्याध्यक्षपदी फिरोज सतारमेकर यांची निवड
कोल्हापूर : सिद्धाळा गार्डन येथे सर्वधर्मीय जयंती समितीच्या बैठकीमध्ये उपाध्यक्ष प्रशांत अवघडे, सेक्रेटरी सतीश रास्ते, खजानिस निवास सूर्यवंशी यांच्या निवडी करण्यात आल्या.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस उपाधीक्षक आर.आर.पाटील होते. याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी कमिट्या स्थापन करण्यात आल्या.यामध्ये व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, कराओके व विविध स्पर्धा, अन्नदान,वैद्यकीय शिबिरे,सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.
ॲड.दत्ताजीराव कवाळे, ॲड.राहुल सडोलीकर,ॲड. अनिल भाले,ॲड.सचिन आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीस अक्षय साळवे, अमोल कुरणे,दाविद भोरे,जहांगीर आत्तार,राजेंद्र मकोटे,अमोल कांबळे, बाळासाहेब साळवी, अभिजित कदम,आदित्य कांबळे, कपिल सकटे,नामदेव नागटीळे,शरद कांबळे,सदाशिव तांदळे, प्रभाकर कांबळे,रोहन डकरे आदी उपस्थित होते.