मागासवर्गीय सभासदांच्या शेअर्स रक्कमेत वाढ करू नये …
(कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने निवेदन..)
गुडाळ/ वार्ताहर संभाजी कांबळे
मागासवर्गीय सभासदांच्या शेअर्स रक्कमेत वाढ करू नये किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना असे निवेदन देण्यात येणार असून कालच बिद्री कारखाना मा.के.एस.चौगले कार्यकारी संचालकसो दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्री,मौनीनगर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई,जिल्हा कोल्हापूर) यांच्या वतीने दिले…निवेदनात म्हटले आहे की दुधगंगा-वेदगंगा सह.साखर कारखान्याकडे मागासवर्गीय सभासद असून सभासदांची शेअर्स रक्कम वाढवली आहे,वाढवलेली रू.15000 ही शेअर्स रक्कम ही मागासवर्गीय सभासदांना न परवडणारी आहे. त्यामुळे ही रक्कम त्यांच्या कडून वसूल करून घेऊ नये तसेच या आधी शासनाकडून रू.5000 शेअर्स रक्कमेवर 50% अनुदान असे 2500रू मागासवर्गीय सभासदांना अनुदान मिळाले होते आता उरलेल्या रू.10000 शेअर्स रक्कमेवर अनुदान देण्याची तरतूद करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्याने शासनाकडे शिफारस करावी व प्रस्तावाची मागणी करावी असे निवेदन राष्ट्रीय उपाध्यक्ष,दलितमित्र पी एस.कांबळे व जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे,जिल्हा सरचिटणीस भिमराव कांबळे,भुदरगड तालुकाध्यक्ष आर.एस.कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष सतीश माने,कागल तालुकाध्यक्ष साताप्पा कांबळे,राधानगरी तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे राधा तालुका युवा अध्यक्ष संभाजीराव कांबळे गुडाळकर व राधानगरी भुदरगड, करवीर, तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते दिले..
फोटो ओळ:: निवेदन देताना राष्ट्रीय उपाध्यक्ष दलित मित्र पी एस कांबळे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे , भीमराव कांबळे, आर एस कांबळे, सातापा कांबळे ,प्रकाश कांबळे शिरसेकर, सतीश माने निवेदन स्वीकारताना कार्यकारी संचालक के एस चौगले आदी मान्यवर