इचलकरंजी MSCB चा मनमानी भोंगळ कारभार
आधीच मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयानक संकटाने वैतागलेल्या सामान्य माणसासमोर आर्थिक प्रश्न आवासून उभे आहेत अशा काळात सर्वसामान्य यंत्रमाग कामगारांचे शहर अशी ओळख असणाऱ्या इचलकरंजी शहरात एम एस सी बी (MSCB) चा अतिशय भोंगळ आणि मनमानी कारभार होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मार्च एण्ड च्या नावाखाली वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटाच सध्या MSCB कडून सुरू आहे नुकताच एका घरातील वीज बिल भरल्यानंतर ही कनेक्शन कट केले गेल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कुटुंबाकडे विज बिल भरले आहे की नाही याची साधी चौकशी करण्याचीही तसदी कर्मचाऱ्यांना घ्यावीशी वाटली नाही.
१४ मार्च ही वीज बिल भरण्याची अंतिम तारीख वीज बिलावर असताना त्यानंतर १ दिवसात कोणत्याही सुचने शिवाय वीज कनेक्शन कट करण्याचे काम MSCB कर्मचाऱ्यांकडून सध्या होत आहे. ३ अंकी विज बिल असणाऱ्या सामान्य माणसांना नाहक त्रास देताना लाखो रुपये थकीत असणाऱ्या उद्योजकांकडे MSCB अधिकारी कानाडोळा करत असल्याचा रोष सुद्धा सामान्य माणसांकडून होत आहे.
सध्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत मुळातच वर्षभर कोरोना मुळे शाळेच्या पायऱ्या चढणे मुलांसाठी किती त्रासदायक होते हे आपण पाहिले आहेत. किमान परीक्षा काळात भरपूर अभ्यास करुन चांगले गुण मिळवू यावर विद्यार्थ्यांचा भर असतो अशा काळात MSCB कडून वीज कनेक्शन कट केले जात आहे.
मार्च एन्ड च्या नावाखाली वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा सध्या MSCB कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. सामान्य माणसांनी यावर काय करायचं कुणाकडे दाद विचारायची अशी भावना व्यक्त होत आहे. MSCB कार्यालयातही चौकशीसाठी गेलेल्या किंवा बिलातील शंका संदर्भात निरसनासाठी गेलेल्या नागरिकांची कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जात आहे. आणि याहून कहर म्हणजे अधिकारीवर्ग सुद्धा वेळेवर भेटत नाही २-३ वेळा सामान्य माणसाने हेलपाटे घालून सुद्धा अधिकाऱ्यांची साधी भेट होत नाही.
मार्च एन्ड च्या नावाखाली अधिकारी लोक जाग्यावर नसणे आणि चौकशीसाठी उपलब्ध न होणे हे सामान्य माणसांसाठी अधिकच त्रासदायक ठरते आहे. एकूणच MSCB च्या कारभारा मुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे याकडे वरिष्ठांनी व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी लक्ष दिले जावे अशी भावना सामान्य माणसाची आहे.