नोंदीत बांधकाम कामगारांचे सर्व प्रलंबित अर्ज त्वरीत मंजूर करून लाभ द्या या मागण्यासाठी सोमवार तारीख २१//३/२०२२ रोजी सांगली मराठा सेवा संघ सभागृह (सांगली सिव्हिल हॉस्पिटल पाठीमागे) येथे बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा.
मुंबई उच्च न्यायालय आदेशानुसार जिल्हयातील बांधकाम कामगार आणि सांगलीतील बेघरांना घरे द्या. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना घरे द्या यासाठी मेळाव्याच्या ठिकाणीं अर्ज भरून घेतले जाणार आहेत. मेळाव्यामध्ये नवीन नोंदनी अर्ज, नूतनीकरण अर्ज व सर्व प्रकारच्या लाभाचे अर्ज संधर्भात मार्गदर्शन केले जाईल.
सांगली जिल्ह्यातील सध्या प्रधानमन्त्री आवास योजने अंतर्गत वीस हजार पेक्षाही जास्त घरे मंजुर आहेत परंतू शासनाने या घरांच्यासाठी जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे ही योजना सांगली जिल्ह्यात अयशस्वी ठरली आहे.
दरम्यान बांधकाम कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मेळाव्याचे प्रमुख वक्ते – मिरजेत प्रधानमन्त्री आवास योजने अंतर्गत १८० घरकुले बांधणारे बिल्डर श्री विनायक गोखले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री संदीप राजोबा, बांधकाम व्यावसायिक श्री विद्याधर पाटील. मेळाव्याचे अध्यक्ष कामगार नेते कॉ शंकर पुजारी असणार आहेत.
ता. १४ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाचे कामगार आयुक्त श्री सुरेश जाधव व बांधकाम कल्याणकारी मंडळ सचिव श्री श्रीरंगम यांच्याबरोबर कामगार संघटना बरोबर झालेल्या चर्चेची माहितीही देण्यात येईल.
सध्या महाराष्ट्रामध्ये कामगार खात्यामध्ये पन्नास टक्के पेक्षाही जास्त पदे जागा रिक्त आहेत त्यांची सर्व कामे कंत्राटी कामगार कर्मचारी करीत आहेत. परंतू शासना त्यांना अत्यंत कमी पगार देऊन त्यांचे शोषण करीत आहे. म्हणुनच त्यांना न्याय्य मिळाला पाहिजे यासाठी मेळाव्यामध्ये चर्चा होणार आहे.
तरी या महत्वपूर्ण मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करणारे पत्रक युनियनच्या सरचिटणीस प्रा. शरयू बडवे आणि संघटनेचे सचिव विशाल बडवे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.